Type Here to Get Search Results !

पाटोदा तालुक्यातील लिंबादेवी यात्रेला उत्साहाचा उसळता प्रतिसाद बाळाला शिखरावरून टाकण्याची पारंपरिक प्रथा आजही कायम


पाटोदा तालुक्यातील लिंबादेवी यात्रेला उत्साहाचा उसळता प्रतिसाद बाळाला शिखरावरून टाकण्याची पारंपरिक प्रथा आजही कायम पाटोदा : संजय सानप तालुक्यातील पिठ्ठी गावातील ग्रामदैवत लिंबादेवी यात्रेला यंदाही उत्साह, भाविकांच्या श्रद्धा आणि परंपरेची जोड लाभली. दत्तजयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित केली जाणारी ही ऐतिहासिक व पारंपरिक यात्रा आजही अखंडीतपणे साजरी होत असून, देवीचे मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. या यात्रेची खास ओळख असलेली लहान बाळाला शिखरावरून टाकण्याची’ प्राचीन प्रथा यंदाही विधिवत पार पडली. नवस फेडण्यासाठी शेकडो कुटुंबांनी देवीसमोर हजेरी लावली. नवस पूर्ण झाल्यावर देवी शिखरावरून बाळांना प्रतीकात्मकरीत्या खाली सोडण्याची परंपरा अनेक वर्षांपासून पाळली जाते. भाविकांच्या मते, ‘देवी नवसाला पावणारी आहे’ अशी लोकश्रद्धा असून, त्यानुसार ही प्रथा आजही कायम आहे. पिठ्ठी, नायगाव, उखंडा, निरगुडी, तसेच पंचक्रोशीतील गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने यात्रेस उपस्थित राहिले. सर्वधर्मसमभाव, सामूहिक सहभाग आणि आनंदाचा माहोल यामुळे यात्रेचे सार्थक स्वरूप अधिकच खुलले. लिंबादेवी मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक विधी, वारी, महाप्रसाद आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. ग्रामीण भागातील सर्वांत प्राचीन व लोकप्रिय यात्रांपैकी एक असलेल्या या लिंबादेवी यात्रेला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Post a Comment

0 Comments