Type Here to Get Search Results !

पत्रकारांच्या हस्ते पाटोद्यात वकील दिना निमित्त वकीलांचा सत्कार

   त्रकारांच्या हस्ते पाटोद्यात वकील दिना निमित्त वकीलांचा सत्कार


  पाटोदा (प्रतिनिधी) 

जागतीक वकील दिना निमित्त पाटोद्यात पत्रकार बांधवांच्या वतीने पाटोदा न्यायालयातील वकील बंधू भगिनींचा शाल पुष्प देऊन  सन्मान करण्यात आला.

भारतात दरवर्षी ३ डिसेंबर रोजी वकील दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले राष्ट्रपती आणि विधिज्ञ असलेल्या डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो. या दिवशी वकील समुदायाच्या योगदानाचा, सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या भूमिकेचा आणि कायद्याच्या राज्याला टिकवून ठेवण्याच्या त्यांच्या कार्याचा सन्मान केला जातो वकील समाजाला न्याय मिळवून देण्यात, लोकशाही आणि मानवाधिकारांचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या
दिवशी त्यांच्या या भूमिकेवर प्रकाश टाकला जातो आणि म्हणूनच पत्रकार बांधवांनी येथील न्यायालयात पाटोदा वकील संघाच्या कार्यालयात सर्व वकील बंधू भगिनींचा सत्कार केला यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अॕड.महेश बेदरे, यांनी आपली भूमिका मांडली पाटोदा वकील संघाचे उपाध्यक्ष अॕड.जब्बर पठाण यांनी या सन्मानासाठी दयानंद सोनवणे व हमीदखान पठाण यांचे आभार व्यक्त केले.यावेळी अॕड.घुले साहेब,अॕड.सुधीर घुमरे,अॕड.सचिन जावळे ,अॕड.बी.बी.जावळे,अॕड.सय्यद अश्रफ,अॕड.कोल्हे,अॕड.जाधव,अॕड.वैद्य,अॕड.तळेकर,अॕड.नागरगोजे,अॕड.डबीर,अॕड.जगदाळे, अॕड.सुधीर एकबोटे,
पाटोदा वकिल संघाचे आदी वकील व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments